'NET, SET, PhD; तरीही कायम नोकरी नाही', महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांची 'तासनदारी' - ग्राऊंड रिपोर्ट
महाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही पूर्णवेळ नोकरीची वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे हे प्राध्यापक आजही 'क्लॉक अवर बेसिस' (सीएचबी) किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर काम करत आहेत.
तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या प्राध्यापकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये फिरलो.
प्रदेश वेगळे, विषय वेगळे आणि महाविद्यालयं वेगळी. पण एक गोष्ट जवळपास सगळीकडे सारखीच दिसली. एकाच महाविद्यालयात, एकाच विद्यार्थ्यांना शिकवणारे पूर्णवेळ आणि सीएचबी प्राध्यापक आर्थिकदृष्ट्या मात्र दोन वेगळ्या वास्तवात जगत आहेत.
ही तफावत केवळ पगारापुरती मर्यादित नाही. अनेक महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचा मोठा भार आज तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या खांद्यावर आहे.
पण या व्यवस्थेचा अर्थ नेमका काय? सीएचबीवर काम करणारे प्राध्यापक त्यांच्या वास्तवाला एका वेगळ्याच शब्दात मांडतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






