मुंबईत BMW कार पुलावरून खाली कोसळली, तिघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
मुंबईत BMW कार पुलावरून खाली कोसळली, तिघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Published
भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 जण जखमी आहेत. ही घटना पहाटे 5.30 च्या दरम्यान मुंबईतील कोस्टल रोडवर घडलीय.
प्राथमिक माहितीनुसार, ही बीएमडब्ल्यू कार मरीन ड्राईव्हहून हाजीअलीच्या दिशेने अत्यंत वेगाने जात होती. कोस्टल रोडवरील लोटस जेट्टीजवळ आल्यावर कार चालकाचं नियंत्रण सुटलं.
त्यानंतर ही कार रेलिंगला धडकली आणि थेट पुलावरुन खाली कार पार्किंगचं काम सुरु असलेल्या ठिकाणी कोसळली. या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झालाय.
कारमधील जखमींवर नायर रुग्णालयात उपचार सुरु असून घटनेचं पुढील तपास ताडदेव पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक करत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






