Tsunami : टोंगा बेटावरील त्सुनामीनंतरच्या नुकसानाची न्यूझीलंड करणार पाहणी

हुंगा टोंगा-हुंगा हापाई ज्वालामुखी

फोटो स्रोत, NOAA

फोटो कॅप्शन, हुंगा टोंगा-हुंगा हापाई ज्वालामुखी
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटा टोंगा या देशाला धडकल्या आहेत.

टोंगा येथून सोशल मीडियावर जे फोटो शेयर केले जात आहेत, त्यात घरं आणि चर्चच्या वरून पाणी वाहताना दिसत आहे. टोंगाची राजधानी नुकुअलोफावर ज्वालामुखीतून निघालेली राख सगळीकडे दिसत आहे, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी न्यूझीलंडने टोंगा इथं विमान पाठवलं आहे.

या त्सुनामीचा परिणाम 80 हजार लोकांवर होऊ शकतो, असा अंदाज इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट सोसायटीज (IFRC) नं बीबीसीशी बोलताना म्हटलं.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी म्हटलं की, या त्सुनामीचा मोठा फटका बसला आहे.

आतापर्यंत या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाहीये.

तिथल्या रहिवाशांना उंच जागेवर जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हुंगा टोंगा-हुंगा हापाई या ज्वालामुखीमध्ये होत असलेल्या हालचालीनंतरचा हा ताजा स्फोट आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

न्यूझीलंड, फिजी आणि टोंगासहित जगभरातल्या अनेक देशांमध्ये ज्वालामुखीच्या स्फोटानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. पाण्याच्या आत या ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे.

फिजीची राजधानी सुवा येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 8 मनिटांपर्यंत चाललेल्या ज्वालामुखीचा आवाज इतका मोठा होता की तो 500 मैलावरच्या फिजीमध्येही ऐकू आला.

टोंगाच्या भूगर्भ विभागानं सांगितलं की, ज्वालामुखीतून निघणारा गॅस, धूर आणि ढग आकाशात 20 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. टोंगाची राजधानी हुंगा टोंगा-हुंगा हापाई ज्वालामुखीपासून केवळ 65 किलोमीटर अंतरावर आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

1.2 मीटर उंचीची त्सुनामी दाखल झाल्याचं ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागानं म्हटलं आहे.

हुंगा टोंगा-हुंगा हापाई ज्वालामुखीपासून 2300 किलोमीटर अंतरावरील न्यूझीलंडलाही वादळाचा इशारा देण्याता आला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी'हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)