जंतर मंतरच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल मराठी महिलांनी काय सांगितलं?
जंतर मंतरच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल मराठी महिलांनी काय सांगितलं?
Published
20 जुलैला जंतर मंतर ते संसद इथे झालेल्या आंदोलनादरम्यान गदारोळ झाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला. पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्याचं अनेक आंदोलकांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी 118 पोलीस आणि 60 आंदोलक जखमी झाल्याचं म्हटलंय. तसंच आंदोलक आक्रमक आणि हिंसक वर्तन करत होते असंही सांगितलं आहे. मात्र, किती आंदोलक जखमी झालेत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रातून आलेल्या काही महिलांनी काय म्हटलं जाणून घ्या
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






