सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत, 'बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो…'

व्हीडिओ कॅप्शन, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत, 'बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो…'
सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत, 'बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो…'
Published

विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मंत्रीपद न मिळाल्याची खदखद व्यक्त केली आहे.

रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना खोत यांनी नव्याने महायुतीत दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

'हे सरदार आले मंत्री झाले आणि आपण फक्त बघत बसलो. आपल्यावर काय वाईट वेळ आलीय', असं विधान खोत यांनी केलं..

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केलं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचेही त्यांनी समर्थन केले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)