You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उजनी जलाशयातला हा मासा मच्छीमारांना कंगाल करतोय?
उजनी जलाशयातला हा मासा मच्छीमारांना कंगाल करतोय?
Published
उजनी धरणाच्या जलाशयात झपाट्याने वाढलेल्या सकरमाऊथ कॅटफीशमुळे स्थानिक मच्छीमार अडचणीत आले आहेत.
जाळी फाटणे, स्थानिक माशांचे प्रमाण घटणे आणि पकडलेल्या माशाला बाजारात योग्य भाव न मिळणे, अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय.
मूळचा अमेझॉन परिसरातील हा आक्रमक मासा उजनीत कसा पोहोचला? त्याचा पर्यावरणावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतोय? आणि त्याचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
रिपोर्ट- प्राची कुलकर्णी
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.