'ज्योतिष हे शास्त्र नसून ठगांचा धंदा'; देव, ज्योतिष आणि अंधश्रद्धांवर तरुणांचे श्याम मानव यांना रोखठोक प्रश्न

व्हीडिओ कॅप्शन, समज-गैरसमज: देव, ज्योतिष आणि अंधश्रद्धा: श्याम मानव यांना तरुणांनी विचारले रोखठोक प्रश्न
'ज्योतिष हे शास्त्र नसून ठगांचा धंदा'; देव, ज्योतिष आणि अंधश्रद्धांवर तरुणांचे श्याम मानव यांना रोखठोक प्रश्न
Published

'समज-गैरसमज'च्या या भागात श्रद्धा, अंधश्रद्धा, विज्ञान आणि धर्म याविषयी तरुण पिढीच्या मनात असलेले अनेक प्रश्न समोर येतात. तरुणांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांना बेधडक प्रश्न विचारले आहेत आणि त्यांनी त्यांची मुद्देसूद उत्तरं दिली आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांच्यात फरक कुठे आहे? जादुटोणा विरोधी कायदा कसा आणि का लागू करण्यात आला? ज्योतिष हे खरंच शास्त्र आहे का? अशा अनेक प्रश्नांवर श्याम मानव यांनी आपली भूमिका मांडली आहे.

या संवादात त्यांनी ज्योतिष हे शास्त्र नसून ठगांचा धंदा असल्याचा म्हटलंय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे जादुटोणा विरोधी कायद्याचे प्रशिक्षण थांबवून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बाबांना पाठबळ दिल्याचा आरोपही केला आहे..

'देव काही देत नाही, प्रार्थना केवळ मनाला शांत करते,' असं सांगत वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश अंधश्रद्धा निर्मूलन हाच होता, असंही म्हटलं.

श्रद्धा, अंधश्रद्धा, विज्ञान आणि समाज यांवरील हा विशेष संवाद नक्की पाहा.

लोकेशन

पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर

फिल्ड आणि रिसर्च

दीपाली जगताप

विशेष साहाय्य

विनायक गायकवाड

शूटिंग

शरद बढे

शार्दुल कदम

एडिटिंग

निलेश भोसले

प्रोड्यूसर

प्राजक्ता धुळप

संपादक

अभिजीत कांबळे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)