पॅरिस फॅशन वीक 2026 : अनोख्या स्टाइल्स आणि लक्षवेधी लूक्सची खास झलक; पाहा 22 फोटो

फोटो स्रोत, Justin Shin/WireImage via Getty Images
- Author, ॲनाबेल रॅकहॅम
- Role, सांस्कृतिक प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
हाउट कूटूरचा हा खास आठवडा पॅरिसमध्ये प्रखर उन्हाच्या तडाख्यात पार पडला. फॅशन आणि सेलिब्रिटी जगतातील दिग्गज मंडळी 'कूटूर वीक' फॅशन सोहळ्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाली होती.
शियापरेली, बॅलेन्सियागा, शॅनेल आणि डिओर यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सनी खास हाताने तयार केलेले (हस्तनिर्मित) डिझाइन्स सादर केले. हे अनोखे डिझाइन्स तयार करण्यासाठी शेकडो तासांची मेहनत लागते.
हाउट कूटूर वीक वर्षातून दोनदा आयोजित केला जातो. हा इतका खास फॅशन सोहळा आहे की, येथे आपलं कलेक्शन सादर करण्यासाठी फ्रान्सच्या फॅशन क्षेत्राचं नियंत्रण करणाऱ्या अधिकृत संस्थेचं आमंत्रण मिळणं आवश्यक असतं.
4 दिवस चाललेल्या या फॅशन शोमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात बॅड बनी, हडसन विल्यम्स, सब्रिना कारपेंटर आणि कार्डी बी यांसारख्या बड्या स्टार्सचा समावेश होता.
शियापरेलीच्या फॅशन शोमध्ये झळकलेले सेलिब्रिटी
शियापरेलीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर डॅनियल रोझबेरी यांनी 2026-27 च्या हिवाळी हंगामासाठी 'द कॉल ऑफ द व्हॉइड' हे हाउट कूटूर कलेक्शन सादर केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, हे कलेक्शन तयार करताना त्यांनी 'अनोळखी सर्जनशील प्रक्रियेवर पूर्णपणे विश्वास ठेवला.

फोटो स्रोत, Arnold Jerocki/Getty Images & Neil Mockford/WireImage
या फॅशन ब्रँडने आपल्या पाहुण्यांना आकर्षक पोशाख परिधान करून शोमध्ये आणले. त्यामध्ये रॅपर आणि अभिनेता बॅड बनी याचाही समावेश होता.
युरोपमधील त्याच्या वर्ल्ड टूरमधून वेळ काढत तो पहिल्यांदाच हाउट कूटूर वीकला आला. त्याने बटर यलो रंगाचा सूट परिधान केला होता.

फोटो स्रोत, JB Lacroix/GC Images & WWD via Getty Images
अभिनेत्री एमा कॉरिन ही देखील या फॅशन शोला आली होती. तिने पेस्टल रंगाचे पिसांनी सजवलेले जॅकेट परिधान केले होते. तिच्या पोशाखावरील नखांसारखी टोकदार सजावट विशेष लक्ष वेधून घेत होती.
बालेंसियागांसाठी पिअरपाओलो पिचिओलीचं कलेक्शन
बालेंसियागा यांच्यासाठी पिअरपाओलो पिचिओली यांचं पहिलं हाउट कूटूर कलेक्शन सर्वांच्या अपेक्षांवर खरं उतरलं.
व्हॅलेंटिनोचे माजी डिझायनर असलेल्या पिचिओली यांनी बालेंसियागाचे संस्थापक क्रिस्तोबल बालेंसियागा यांच्या खास शैली आणि डिझाइन्सला आदरांजली वाहिली.

फोटो स्रोत, Giovanni Giannoni/WWD via Getty Images
जिजी हदीद काळ्या पिसांनी सजवलेल्या कोकून शैलीतील पोशाखात खुल्या रॅम्पवर चालताना सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या शोमधील सर्वच पोशाख वेगवेगळे रंग, पोत (टेक्स्चर) आणि आकर्षक डिझाइन्समुळे एकदम खास ठरले.

फोटो स्रोत, Estrop/Getty Images
या शोमधील प्रत्येक पोशाख असा होता की, मॉडेल्स आणि प्रेक्षकांनाही आरामदायी वाटावं. विशेष म्हणजे, उष्णतेची लाट असताना ही बाब सर्वांसाठी दिलासादायक अशी ठरली.

फोटो स्रोत, Arnold Jerocki/Getty Images for Balenciaga
अभिनेता हडसन विल्यम्स बालेंसियागाच्या फॅशन शोला उपस्थित होता.

फोटो स्रोत, Giovanni Giannoni/WWD via Getty Images
शो संपल्यानंतर पिअरपाओलो पिचिओली (मध्ये) रॅम्पवर (रनवे) आले.
जाँ पॉल गॉल्टिएसाठी ड्युरान लँटिंकचं कलेक्शन
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ड्युरान लँटिंकची जाँ पॉल गॉल्टिएचे कायमस्वरूपी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे त्याच्या पहिल्या हाउट कूटूर कलेक्शनची सर्वांनाच खूप उत्सुकता होती.

फोटो स्रोत, Courtesy of Jean Paul Gaultier
या कलेक्शनची संकल्पना बदल, कल्पकता आणि नाट्यमयता याभोवती होती.
लँटिंकने सांगितलं की, फ्रान्सची राणी मेरी अँटोइनेटपासून त्याला प्रेरणा मिळाली. आधुनिक काळात त्या कशा दिसल्या असत्या, ही कल्पना त्याने या कलेक्शनमधून मांडली
शॅनेलसाठी मॅथ्यू ब्लाझीच्या परीकथेची झलक

फोटो स्रोत, Courtesy of Jean Paul Gaultier
मॉडेल उग्बाद अब्दीने शॅनेलच्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला.

फोटो स्रोत, GEOFFROY VAN DER HASSELT / AFP via Getty Images
शॅनेलचा कलात्मक संचालक मॅथ्यू ब्लाझीने आपल्या हाउट कूटूर कलेक्शनमध्ये कल्पनारम्य आणि परीकथेसारखी शैली सादर केली.

फोटो स्रोत, Stephane Cardinale - Corbis/Dominique Maitre - WWD via Getty Images
वेली आणि बीनस्टॉक्सच्या (शेंगांच्या वेलींच्या) सजावटीच्या पार्श्वभूमीवर हा फॅशन शो झाला. एका मॉडेलने कोको शॅनेलच्या मालकीचे असलेले परीकथांचे पुस्तक हातात घेऊन रॅम्प वॉक केला.

फोटो स्रोत, Kristy Sparow/Getty Images
हे संपूर्ण कलेक्शन वास्तवापासून दूर, एका कल्पनारम्य जगात घेऊन जाणारे होते. सुंदर फुलांच्या नक्षीचे पोशाख आणि डिज्नीच्या राजकुमारीलाही शोभतील असे आकर्षक दागिने व ॲक्सेसरीज पाहायला मिळाल्या.
ख्रिश्चन डिओरसाठी जोनाथन अँडरसनचं कलेक्शन
जोनाथन अँडरसनची हाउट कूटूर शोमधील डिझाइन्सपेक्षा आणखी एका कारणामुळे त्याची चर्चा झाली. टेलर स्विफ्ट आणि ट्रॅव्हिस केल्सी यांच्या लग्नातील वधूची वेशभूषा डिझाइन करण्यामागे डिओरचा डायरेक्टर जोनाथन अँडरसन हाच असल्याचे समोर आले.

फोटो स्रोत, Victor VIRGILE/Gamma-Rapho via Getty Image
शोमध्ये विवाहाच्या पोशाखांची आठवण करून देणारे काही लूक्स सादर करण्यात आले. परंतु, हे टेलर स्विफ्टच्या अद्याप न पाहिलेल्या विवाहाच्या ड्रेसशी कितपत जुळतात, हे अजून समोर आलेले नाही.

फोटो स्रोत, Swan Gallet/WWD via Getty Images
हे कलेक्शन अमेरिकन शिल्पकार लिंडा बेंग्लिस यांना समर्पित होते. यात ॲकॉर्डियनसारख्या घड्या असलेले ड्रेस, स्कर्ट्स आणि ॲक्सेसरीजचा समावेश होता.

फोटो स्रोत, Victor VIRGILE/Gamma-Rapho via Getty Images
ख्रिश्चन डिओरच्या 2026-27 हाऊट कूटूर कलेक्शनमधील आकर्षक पोशाख.

फोटो स्रोत, Victor VIRGILE/Gamma-Rapho via Getty Images
आयरिस व्हॅन हर्पेनचं विज्ञानावर आधारित हाउट कूटूर कलेक्शन
व्हॅन हर्पेन सांगते की, विज्ञानावर आधारित तिच्या कलेक्शनमध्ये "अशा शक्तींचा विचार करण्यात आला आहे, ज्या आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम करतात, पण त्यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते."

फोटो स्रोत, Benoit Tessier/REUTERS
तिच्या डिझाइन्समध्ये प्लाझ्माचा वापर करण्यात आला होता. हे विद्युतभारित (चार्ज) वायूचे कण असतात. ते काचेच्या नळ्यांमध्ये भरून कपड्यांना जोडण्यात आले होते. त्यामुळे पोशाख चमकदार आणि तेजस्वी दिसत होते.

फोटो स्रोत, Benoit Tessier/REUTERS
रॅम्प शो पुढे जात असताना प्रत्येक पोशाख अधिकाधिक आकर्षक आणि कलात्मक दिसत गेला. कपड्यांवर केलेले बारकाईचे बीडवर्क (मोत्यांची सजावट) आणि हलक्या, नाजूक पद्धतीने केलेली ड्रेपिंग यामुळे स्कर्ट आणि ड्रेस अजून सुंदर दिसत होते.

फोटो स्रोत, Manon Cruz/REUTERS
ॲलेक्सिस मॅबिलची वेगळी आणि कल्पक शैली
हाऊट कूटूर वीकसाठी मॅबिलेच्या कलेक्शनची संकल्पना 'दुहेरीपणा'वर (द्वैत) आधारित होती. त्यात अपेक्षेपेक्षा अधिक काहीतरी खास पाहायला मिळेल, अशी कल्पना मांडण्यात आली.

फोटो स्रोत, Benjamin Cremel/Getty Images
प्रत्येक पोशाख आधी एका वेगळ्या रूपात दिसत होता, पण काही क्षणांतच तो दुसऱ्या लूकमध्ये रूपांतर होत असत. त्यासोबतच त्याची रचना आणि शैलीही लगेचच बदलत असत.

फोटो स्रोत, Benjamin Cremel/Getty Images
या कलेक्शनमध्ये रंगांनाही विशेष महत्त्व देण्यात आलं होतं. यात काळा, सिल्व्हर (चंदेरी) आणि सोनेरी रंगांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Benjamin Cremel/Getty Images
रॅम्पवरच बदलणारा मॅबिलेचा खास लूक.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























