युपीच्या एका गावात 'Made in Pakistan' पंखा आढळला, पुढे काय घडलं?

युपीच्या एका गावात 'Made in Pakistan' पंखा आढळला, पुढे काय घडलं?
Published

उत्तर प्रदेशच्या एका गावात सापडलेल्या एका पंख्यावरून असा वाद झाला की काही लोकांना पोलीस स्टेशन गाठावं लागलं.

घटना कुशीनगरमधली आहे, जिथे एक मदरशाला दान करण्यात आलेल्या पंख्यामुळे इथल्या मौलवींना पोलीस स्टेशनला जावं लागलं.

झालं असं की विष्णुपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मदरसा कादरिया हकीकतुल उलूम मध्ये लागलेला हा पंखा खराब झाला. त्याला ठीक कऱण्यासाठी जवळच्या एका electrician कडे नेण्यात आलं.

मग पंखा दुरुस्तीसाठी उघडताच electrician ला दिसलं की पंख्यावर Made in Pakistan लिहिलंय.